सावदा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड अविरोध; एकमताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पूर्ण

बातमी शेअर करा...

सावदा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची निवड अविरोध; एकमताने निवडणूक प्रक्रिया शांततेत पूर्ण

सावदा | येथील सावदा दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादितच्या सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कार्यकाळासाठीच्या संचालक मंडळाची निवडणूक एकमताने आणि शांततेत पार पडली. संस्थेच्या एकूण १७ संचालक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र, कोणत्याही पदासाठी प्रतिस्पर्धी उमेदवार न आल्याने सर्व उमेदवार महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम, २०१४ मधील नियम ३२ नुसार बिनविरोध निवडून आले.

या निवडणुकीत कोणतीही मतदान प्रक्रिया झाली नाही. एकमताने पार पडलेल्या या निवडणुकीमुळे संस्थेच्या कारभारात सलोखा, ऐक्य आणि शांतता अधोरेखित झाली आहे.

अविरोध निवडून आलेले संचालक पुढीलप्रमाणे :

सर्वसाधारण मतदारसंघातून: वाणी राहुल नोमदास, नेमाडे भरत प्रल्हाद, वाणी परिक्षित शरद, चौधरी धनंजय वासुदेव, चौधरी संजय रामचंद्र, राणे मुरलीधर सुदाम, नेमाडे रविंद्र बळीराम, पाटील किरण जनार्दन, बढे जगदीश लहू, वाघुळदे विजय प्रकाश, बेंडाळे रविंद्र श्रावण, जावळे कुशल सुरेंद्र

इतर मागासवर्गीय मतदारसंघातून: बढे देवानंद नामदेव

विशिष्ट मागास प्रवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून: जोगी हेमराज मन्साराम

महिला राखीव मतदारसंघातून: बाँडे ज्योत्स्ना नरेंद्र, चौधरी सुलभा यशवंत

दरम्यान, अनुसूचित जाती मतदारसंघातील एक जागा रिक्त राहिल्याची नोंद आहे.

या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांमधील समन्वय आणि एकात्मतेचे उदाहरण पाहायला मिळाले. नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत असून, संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी हे मंडळ भरीव कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या निवडणुकीचे संपूर्ण कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम