सावदा नगरपरिषद व पोलीसांची नायलॉन मांजा जप्तीची धडक कारवाई
सावदा : मकर संक्रातीचा सण जवळ आला असून यानिमित्ताने अनेक ठिकाणी पतंग उडवण्याचा खेळ खेळला जातो.पतंगबाजीला सुरुवात झाली असून आकाशात विविध रंगाची पतंग उडताना पाहायला मिळत आहे.परंतु पतंगबाजीसाठी मोठ्या प्रमाणात जीवाला धोकादायक आणि कायद्याने बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा सर्रास वापर होत असतो,
आनंदाचे प्रतीक असलेल्या मकर संक्रांतीनिमित्त पतंगबाजीचा खेळ खेळला जातो. यासाठी पारंपारिक मांजाचा उपयोग केला पाहिजे, मात्र नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने पतंग उडवण्याची भारी हौस मात्र अनेकांसाठी जीवघेणी ठरत असल्याचं वास्तव सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. इतरांपेक्षा आपलाच पतंग उंच उडावा आणि आपणच पतंगाचे किंग ठरावे या इर्शेतून चक्क प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून सर्रास पतंग उडवले जात आहेत.
मात्र घातक मांजामुळे निष्पाप जीवांचा नाहक बळी जात असून अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला इजा झाली, तर अनेक बालकांचे हात चिरले आहे. तर आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना देखील इजा झाली आहे. त्या अनुषंगाने आज सावदा नगरपरिषद व सावदा पोलीस स्टेशनची नोयालोन मांजा जप्तीची धडक कारवाई मुख्याधिकारी भूषण वर्मा व सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाईत मांजा विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली व प्रशासनातर्फे विक्रेते व नागरिकांना नायलॉन मांजा न वापरण्याचे आवाहन करण्यात आले. सदर पथकात लेखापाल विशाल पाटील, पोलीस कॉन्स्टेबल मयूर पाटील, सतीश पाटील,अविनाश पाटील हमीद तडवी, कार्तिक ढाके, अरुणा चौधरी आदी सहभागी होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम