सावदा पालिकेकडून घरपट्टी पाणीपट्टी वसूली मोहीम सुरू

कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन

बातमी शेअर करा...

सावदा पालिकेकडून घरपट्टी पाणीपट्टी वसूली मोहीम सुरू

कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणा करण्याचे आवाहन

सावदा प्रतिनिधी :

सावदा नगरपालिका हद्दीतील मिळकतींची घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून, थकबाकीदारांची नळ कनेक्शन्स पालिकेच्या वसुली पथकाकडून बंद करण्यात येत आहेत. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कराचा भरणाकरून, सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी केले आहे.

2024-25 या आर्थिक वर्षाची अखेर सुरू असून, काही मिळकतदारांनी अद्यापही घरपट्टीची रक्कम भरलेली नाही. थकीत कराच्या वसुलीसाठी पालिकेने कर्मचाऱ्यांची विभागनिहाय सहा वसुली पथक तयार केलेले आहेत. ही पथके घरोघरी जाऊन मिळकत कराचा भरणा करण्याचे आवाहन करून, थकबाकी वसुली करत आहेत. थकबाकीदारांनी त्यांच्याकडील थकीत घरपट्टी व पाणीपट्टी त्वरित भरून, जप्ती, नळ कनेक्शन बंद करण्याची कटू कारवाई टाळावी. पालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे

शहरात ६८०० मालमत्ता धारक आहेत व ४३०० नळ कनेक्शन, घरगुती व्यवसाय व व्यावसायिक मिळून आहेत. गेल्या १० दिवसापासून पालिकेचे अधिकारी कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहेत.२७४ थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा घेऊन अडवून ठेवण्यात आलेले आहे. १८ नळ कनेक्शन बंद करण्यात आलेले आहे. ९ गाडे सील करण्यात आले आहे. मालमत्ता व पाणीपट्टी आणि गाळे धारकांनी मार्च महिन्याच्या अगोदर थकबाकी भरावी असे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी आवाहन केलेले असून कार्यालयीन अधीक्षक प्रमोद चौधरी व कर निरीक्षक मोतीलाल कोळी यांचे सह पालिकेचे कर्मचारी वसुलीसाठी फिरत आहे. नागरिकांनी पालिकेचा कर भरणा वेळेत भरून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. सावदा पालिकेकडून वसुलीची मोहीम ही चालूच राहील असे पालिकेतर्फे सांगण्यात आले. प्रमोद चौधरी यांच्या देखरेखीखाली वसुली पथकात लेखापाल विशाल पाटील, लेखापरीक्षक भारती पाटील, संदीप पाटील, अरुण ठोसरे, अमितडवी, पाणी पुरवठा पथकात अविनाश पाटील, कार्तिक ढाके, विश्वास साळी, कल्पेश पाटील इत्यादी वसुली मोहिमेत सहभागी झाली असून पालिकेचा कर भरणा ऑनलाईन सुरू झालेला आहे. आपण ऑनलाइन किंवा चेक द्वारे सुद्धा भरणा करू शकता असे पालिकेतर्फे सांगण्यात आले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम