सावदा पो.स्ट.चे हवालदार विनोद पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

बातमी शेअर करा...

रावेर – विजय पाटील
पंधरा वर्षे उत्कृष्ट सेवा अभिलेख राखल्याबद्दल पोलीस विभागातर्फे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह – २०२४ पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील सुमारे अकरा पोलीस कर्मचारी असून त्यापैकी सावदा पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार विनोद बळीराम पाटील यांना सन्मानचिन्ह पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. याबाबतचा सोहळा दि. १ मे महाराष्ट्र दिन रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असून ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर पालकमंत्री यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन संपन्न होणार आहे.
या पुरस्काराबद्दल पोलीस हवालदार विनोद पाटील यांचे अभिनंदन सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उप निरीक्षक अमोल गर्जे आणि सर्व सावदा पोलिसांनी अभिनंदन केले आहे.
श्री. विनोद पाटील यांनी सुमारे ७ वर्षे रावेर पोलीस स्टेशन येथेही सेवा दिलेली आहे. म्हणून त्यांचे संपूर्ण रावेर तालुक्यातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम