सावदा येथील कृषिकन्यांचे शीतकक्ष यावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक

बातमी शेअर करा...

सावदा येथील कृषिकन्यांचे शीतकक्ष यावर शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक

सावदा प्रातिनिधी –

शीतकक्ष बाहेरील तापमानापेक्षा १०-१५ अंश थंड राहते. आणि सुमारे ९० टक्के सापेक्ष आर्द्रता राखता येते. ज्याने ताजी फळे, भाज्या आणि फुले यांची विक्रीक्षमता वाढवते. शेतकऱ्यांना शून्य ऊर्जेवर शीतकक्षा उभारणीची माहिती दिली.

शेतकऱ्यांनी पिकवलेला कृषी माल नाशवंत असल्यामुळे त्याची त्वरित विक्री न झाल्यास खराब होतो. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. शेतकऱ्यांचे हे नुकसान लक्षात घेऊन जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या कृषिकन्यांनी (सावदा , ता. रावेर) येथील शेतकऱ्यांना शून्य ऊर्जेवर आधारीत शीतकक्षाची प्रात्यक्षिकासह उभारणी करून माहिती दिली.

ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनी नेहा बाविस्कर , गौरी भोसले , नेहा खोडपे , सुजाता काळे ,माधुरी सपकाळे यांनी सावदा येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत शून्य ऊर्जेवर आधारीत शीतकक्ष उभारला.

पूर्वीच्या काळात फ्रीज, कोल्ड स्टोरेज नसताना शेतकरी या शून्य उर्जेवर आधारित शीतकक्षांचा मोठ्या प्रमाणात वापर करायचे. आजही ग्रामीण भागात अनेकदा वीज नसते. अशा ठिकाणी या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांच्या शेतमालाचे साठवणूक कालावधी वाढून त्यांचे आर्थिक नुकसान टाळता येईल. या कार्यानुभवसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी डाॅ. मोनिका .एस. भावसार आणि विषयाचे विशेष तज्ज्ञ प्रा. संदीप पाऊलझगडे यांनी कृषिकन्यांना मार्गदर्शन केले आणि सावदा ग्रामस्थांनी कृषीकन्यांना चांगला प्रतिसाद दिला , त्यात संतोष भंगाळे , किशोर देवकर ,विठ्ठल चौधरी सभागवत पाटील , सौरभ नेमाडे , प्रिती चौधरी ,प्रभावती कोळंबे हे ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम