सावदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती स्थापन

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन

बातमी शेअर करा...

सावदा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती स्थापन

विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन

सावदा प्रतिनिधि

यंदा म्हणजेच १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सावदा शहरात विशेष उत्साहात आणि भव्य दिव्य पद्धतीने साजरी होणार असून, यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती – 2025” ची नुकतीच स्थापना करण्यात आली. या समितीत शहरातील युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्याने जयंती उत्सवाला विशेष रंगत येणार आहे. या वर्षी जयंतीनिमित्त आकर्षक वाजंत्री, सामाजिक संदेश देणारे देखावे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि जनजागृतीपर उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांमधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि सामाजिक एकतेचा संदेश दिला जाणार आहे.

या समितीत – अध्यक्षपदी सिद्धांत संन्यास तर उपाध्यक्ष म्हणून निखिल लोखंडे आणि राज भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सचिव प्रकाश तायडे, सहसचिव मनोज भालेराव, खजिनदार विवेक डोळे, कोषाध्यक्ष रोनित तायडे आणि सल्लागारपदी लखन सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून पवन लोखंडे, रोहित संन्यास, सिद्धांत लोखंडे, सारंग तायडे आणि दीपक तायडे यांची निवड करण्यात आली. जयंती उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, सामाजिक सलोखा आणि बंधुतेचा संदेश समाजात पोहोचवावा. असे समितीच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम