
सावदा येथे दुर्गावाहिनीचे शौर्य संचलन । महिलांचा लक्षणीय सहभाग
सावदा येथे दुर्गावाहिनीचे शौर्य संचलन । महिलांचा लक्षणीय सहभाग
सावदा (प्रतिनिधी) – विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषद, दुर्गावाहिनी, देवगिरी प्रांताचा भुसावळ जिल्ह्याचा कार्यक्रम आज सावदा येथे संपन्न झाला. सावदा येथील श्री दुर्गामाता मंदिरासमोरून निघालेल्या शौर्य संचलनात मुली, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. शौर्य संचलना नंतर शस्त्र पूजन, प्रतिमा पूजन आणि बौद्धिक कार्यक्रम झाले.
या कार्यक्रमास भारतीय सेना अधिकारी कॅप्टन मीरा सिद्धार्थ दवे या प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी त्यांनी उपस्थित स्त्रीशक्तीला मार्गदर्शन करून धर्म, संस्कृती आणि राष्ट्र कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत चे प्रांत मंत्री श्री योगेश्वरजी गर्गे, प्रांताचे संघटन मंत्री श्री गणेशजी मोकाशी, प्रांताचे सहमंत्री श्री ललितजी चौधरी, भुसावळ जिल्हा अध्यक्ष श्री गजाननजी लोणारी, भुसावळ जिल्हा मंत्री श्री योगेशजी भंगाळे, दुर्गा वाहिनी प्रांत सहसंयोजिका स्नेहल विसपुते, जळगाव विभाग सहमंत्री श्री देवेंद्रजी भावसार आदी उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गवरून हे दुर्गावाहिनीचे शौर्य संचलन दिमाखात संपन्न झाले या संचलनात महिला शक्तीची ऊर्जा नागरिकांनी बघितली, यावेळी भाजपा महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी पाटील, एड कालिदास ठाकूर, डॉ चंद्रशेखर पाटील, वीक्की भिडे, यांचेसह बजरंग दल, विश्वहिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, व दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम