सावदा येथे नगरपालिका निवडणुकीचे पार्श्वभूमीवर मोठा पक्ष प्रवेश ; माजी नगराध्यक्षासह नगरसेवक भाजपात

बातमी शेअर करा...

सावदा येथे नगरपालिका निवडणुकीचे पार्श्वभूमीवर मोठा पक्ष प्रवेश ; माजी नगराध्यक्षासह नगरसेवक भाजपा

आ. खडसेंना धक्का
सावदा (प्रतिनिधी) – आ. एकनाथराव खडसे यांचे कट्टर समर्थक तथा शरद पवार गटाचे नेते पंकज येवले यांनी त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा अनिता येवले यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नगरपालिका निवडणूक तोंडावर असतांना आज सावदा येथे मोठी राजकीय घडामोड घडली. जलसंपदा मंत्री ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या उपस्थितीत आज शहरात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यात शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते पंकज येवले तसेच त्यांच्या सौभाग्यवती माजी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनिता येवले यांनी गिरीशभाऊंच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. ना. महाजन यांनी त्यांच्या स्वागत केले.
याप्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष एकलव्य कोल्हे, सामाजिक कार्यकर्ते गजू ठोसरे, नितीन पाटील, मनीष पाटील आदींनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. ना. महाजन यांनी त्यांचे स्वागत केले.
या सोहळ्याला ना. गिरीश महाजन यांच्यासह आ. अमोल जावळे, पक्षाचे रावेर लोकसभा निवडणूक प्रभारी नंदकिशोर महाजन, राजेंद्र चौधरी, सावदा निवडणूक प्रभारी दुर्गेश पाटील, यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम