सावदा येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी, ठिकठिकाणी नाकाबंदी

बातमी शेअर करा...

सावदा येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून वाहनांची कसून तपासणी, ठिकठिकाणी नाकाबंदी

सावदा प्रतिनिधी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि अवैध वाहतूक रोखण्यासाठी सावदा पोलिसांनी व्यापक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शहरात तसेच उपनगरांमध्ये पोलीस पथके वाहनांच्या कसून तपासणीसह संशयितांवर करडी नजर ठेवून आहेत.

शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या सर्व मुख्य मार्गांवर स्थायी नाकाबंदी लावून प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी सुरू आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवून पोलिसांनी सीमावर्ती भागात तपासणी अधिक तीव्र केली आहे. विशेष भरारी पथके संशयास्पद वाहनांवर सतत लक्ष ठेवून आहेत.

फैजपूर रोडवरील साईबाबा मंदिर परिसरात झालेल्या तपासणी मोहिमेत नगरपालिका कार्यालयीन अधीक्षक प्रमोद चौधरी, राजू साळी, दिलीप तुरे, आकाश तायडे, रितेश महाजन (फोटोग्राफर), पोलीस कर्मचारी प्रकाश जोशी, अतुल तडवी आणि मोजेस पवार यांनी सक्रिय सहभाग घेतला. वाहनांची डिक्की, सीटखालील जागा, तसेच वाहनचालकांकडे असलेली सर्व कागदपत्रे बारकाईने तपासली जात आहेत.

रोख रक्कम, अवैध दारू, बंदी असलेल्या वस्तू किंवा निवडणूक प्रचार साहित्याची वाहतूक होत आहे का, यावर पोलिसांचे विशेष लक्ष असून, काही ठिकाणी तपासणी प्रक्रियेची व्हिडिओग्राफीही केली जात आहे. निवडणुकीत कोणत्याही गैरप्रकाराला थारा दिला जाणार नाही, असे स्पष्ट करताना सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम