
सावदा येथे मतदान साहित्य वाटप; यंत्रसामुग्रीसह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना
सावदा येथे मतदान साहित्य वाटप; यंत्रसामुग्रीसह कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना
सावदा प्रातिनिधी – येत्या 2 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी सोमवार रोजी मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट तसेच इतर सर्व साहित्य वाटपाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हे साहित्य घेऊन मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचारी आपापल्या नेमून दिलेल्या केंद्रांवर रवाना झाले आहेत.
मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, निवडणूक विभागाने सावद्यातील साहित्य वाटप केंद्रावरून मतदान पथकांना मतदान यंत्रे (EVM), मतदारांच्या याद्या, आवश्यक स्टेशनरी आणि इतर महत्त्वाचे साहित्य वितरित केले. सावदा येथे एकूण 24 मतदान केंद्र आहेत यासाठी 24 मतदान युनिट व 31 बॅलेट युनिट वाटप केले असून प्रत्येक मतदान केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष 4 कर्मचारी 1 शिपाई एक सुरक्षारक्षक असे एकूण 7 जण असणार असून शहरात 24 केंद्रावर एकूण 168 कर्मचारी तसेच इतर सहाय्यक मिळून सुमारे 205 कर्मचारी असणार आहे. केंद्र व केंद्राबाहेर बंदोबस्तासाठी 1 ए. पी. आय., 2 पी. आय., 4 एस. आर. पी., 50 पोलीस, 50 गृहरक्षक दलाचे जवान असा तगडा बंदोबस्त असणार असून मतदान केंद्र व केंद्र बाहेर कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तसेच मतदान प्रक्रिया सुव्यवस्थेत व शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भूषण वर्मा हे लक्ष घालून आहेत. मतदानासाठी प्रत्येक केंद्रावर एक याप्रमाणे 24 ईव्हीएम मशीन व राखीव 10 अशा एकूण 34 ईव्हीएम ची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानादरम्यान सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे चित्रीकरण करण्यात येणार असून प्रत्येक मतदारास 3 मते देण्याचा अधिकार असून नगराध्यक्षपदासाठी फिकी गुलाबी मतपत्रिका, सदस्य अ साठी पांढरी व सदस्य ब साठी फिकी निळ्या रंगाची मतपत्रिका राहणार आहे. 2 तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून आपला हक्क बजावावा, असे आवाहन देखील करण्यात आले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम