
सावदा येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न
विविध गावांतील प्रतिनिधींच सहभाग
सावदा येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची बैठक संपन्न
विविध गावांतील प्रतिनिधींच सहभाग
सावदा | प्रतिनिधी – सावदा येथे महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाची महत्त्वपूर्ण विचारमंच बैठक डॉ. विजय वारके यांच्या दवाखान्याच्या बेसमेंटमध्ये पार पडली. या बैठकीत रावेर तालुक्यातील विविध गावांतील प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.
बैठकीस महासंघाचे अध्यक्ष अरुण बोरोले, कोषाध्यक्ष डॉ. मिलिंद पाटील, सल्लागार डॉ. प्रमोद महाजन (नाशिक), बंडू दादा काळे (जळगाव), उद्योजक नितीन इंगळे, महेंद्र पाटील, प्रकाश वराडे (खानदेश विभाग संयोजक) तसेच महासंघाच्या महिला पदाधिकारी सौ. ज्योती महाजन, सौ. नीता वराडे, सौ. सीमा गाजरे, सौ. संगीता भोळे, सौ. नीलिमा राणे व रितेश भारंबे (भुसावळ) हे उपस्थित होते.
बैठकीत गावागावात महासंघाच्या शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समाजातील बेरोजगार, तरुण-तरुणी, शेतकरी आणि उद्योजकांसाठी रचनात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आला. तरुणांनी नेतृत्व घेऊन समाज एकत्र आणण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर बैठकीत अरुण बोरोले, डॉ. विजय वारके, ॲड. संदीप भंगाळे, डॉ. सुधाकर चौधरी, तरुण उद्योजक रितेश पाटील आणि बंडू दादा काळे यांनी आपले विचार मांडले.
बैठकीस उपस्थित गावनिहाय प्रतिनिधी: मस्कावद – प्रवीण वारके, देवेंद्र पाटील, संतोष पाटील, महेंद्र पाटील खिरोडा – किशोर चौधरी, प्रतीक नारखेडे, सागर नेहेते, महेंद्र चौधरीआमोदा – उमेश पाटील थोरगव्हाण – विलास चौधरी, योगेश झोपे, उमाकांत बाऊस्कर, नंदकुमार चौधरी, गोविंद चौधरी, युवराज चौधरीगाडेगाव – रामानंद वारकेअट्रावल – पवन राजे चौधरी, अनिल भारंबे इंदूर – रविंद्र चौधरी भुसावळ – रितेश भारंबेसावदा – पत्रकार श्याम पाटील व इतर कार्यकर्ते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन नंदकिशोर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. मिलिंद पाटील यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम