सावदा येथे विविध ठिकाणी गोवर्धन पूजन व अन्नकुट महोत्सव साजरा

बातमी शेअर करा...

सावदा येथे विविध ठिकाणी गोवर्धन पूजन व अन्नकुट महोत्सव साजरा
सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथे विविध मंदिरे धार्मिक ठिकाणी व संस्थान मध्ये दि 22 रोजी बुधवारी कार्तिक शु प्रतिपदा या दिवशी व्यापारी नव वर्ष चोपडा पूजन तसेच गोवर्धन पूजन व अन्नकुट छपन्न भोग असे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले
यात खान्देशातील वडताल धाम म्हणून ओळख असेलेल्या स्वामीनारायण मंदिरात सकाळी 11 वा आरती अन्नकुट व सत्संग सभा संपन्न झाली यावेळी येथे शास्त्री विश्वप्रकाशदासजी, शास्त्री सत्यप्रकाशदासजी, शास्त्री भक्तीप्रियदासजी, कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी, व हरिभक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते प्रथम सकाळी संतांचे सत्संग सभेत आशीर्वचन झाले यात त्यांनी अन्नकुटाचे महत्व व सावदा स्वामीनारायण मंदिराचे महत्व सांगितले या नंतर आरती व महाप्रसाद असे कार्यक्रम येथे झाले
तर याच दिवशी सायंकाळी 6 वा येथील श्री स्वामीनारायण गुरुकुल संस्थेत देखील छपन्न भोग अन्नकूट महोत्सव संपन्न झाला यावेळी येथे देखील आरती , सत्संग सभा झाली यावेळी येथे व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष शास्त्री अनंतप्रकाशदासजी हे होते ते प्रमुख पाहुणे म्हणून जळगांव स्वामीनारायण मंदिराचे शास्त्री नयनप्रकाशदासजी, सावदा मंदिराचे कोठारी शास्त्री स्वयंप्रकाशदासजी, तसेच शास्त्री विश्वप्रकाशदासजी,शास्त्री भक्तीप्रियदासजी, माहनुभव संप्रदायाचे राजधर बाबा पूजदेकर, आमदार अमोलभाऊ जावळे, धनंजय चौधरी, सावदा पो.स्टे. चे. स.पो.नी. विशाल पाटील, डॉ संदीप पाटील रावेर, पी, डी, पाटील, निलेश राणे, यांचेसह मान्यवर उपस्थित होते उपस्थित सर्व संतांनी व पाहुण्यांनी आपले विचार यावेळी व्यक्त केले तर मुंबई येथून गुरू शास्त्री,धर्मप्रसाददासजी व मुंबई येथूनच संस्थेचे अध्यक्ष शास्त्री भक्तीप्रसाददासजी यांनी उपस्थितना आपले आशीर्ववचन दिले यानंतर येथे देखील महाप्रसाद देण्यात आला
याच बरोबर सावदा शहरातील गांधी चौकातील श्री विठ्ठल मंदिरात देखील याच दिवशी सकाळी अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भगवंतास विविध भाज्या, मिठाई, व छपन्न भोग यांचा नैवैद्य दाखविण्यात आला विशेष म्हणजे हा सर्व नवैद्य भाविकांनी आपापल्या घरून बनवून आणला होता या नंतर याचे वाटप देखील भाविकांना करण्यात आले, तसेच शहरात अनेक ठिकाणी देखील याच दिवशी अन्नकुट महोत्सव साजरा करण्यात आला

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम