
सावदा येथे ३ सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन
सावदा येथे ३ सप्टेंबर रोजी भुलाबाई महोत्सवाचे आयोजन
केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाउंडेशन चा उपक्रम
जळगाव – केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवसंवर्धिनी आणि गोदावरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 3 सप्टेंबर 2025 रोजी सावदा शहरातील डॉक्टर उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कुल येथे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
भुलाबाई महोत्सव हा आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने आयोजित केला जातो. लहानपणी मुली असलेल्यांकडे गणपती विसर्जनानंतर भुलाबाई बसवल्या जात असत आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाई उत्सवाची सांगता होते. त्या पार्श्वभूमीवर भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये इयत्ता पहिली पासूनच्या मुली ते वयोवृद्ध महिला देखील समूहाने सहभागी होऊ शकतात. यात आवश्यक असलेले वाद्य स्वतः आणायचे आहे संपूर्ण समूहात किमान 12 सदस्य असावे. सादरीकरणासाठी तीन मिनिटाचा वेळ असून त्या वेळेत पारंपरिक भुलाबाईचे गाणे आणि नृत्य सादर करता येणार आहे. तसेच याद्वारे सामाजिक संदेश ही देता येऊ शकतो. प्रत्येक तीन गटातून पहिल्या तीन उत्कृष्ट सदारीकरणास रोख रक्कम, प्रशस्तीपत्र दिले जाईल. तसेच सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तरी लवकरात लवकर नावनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करावा, असे आवाहन गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गौरी जोशी यांच्या 9960577698 या क्रमांकावर संपर्क साधावा.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम