सावदा : “सुश्रुत” रुग्णालयात जर्मन तंत्रज्ञानाची 3D, 4K शस्त्रक्रिया यंत्रणा; ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक उपचार

बातमी शेअर करा...

सावदा : “सुश्रुत” रुग्णालयात जर्मन तंत्रज्ञानाची 3D, 4K शस्त्रक्रिया यंत्रणा; ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक उपचार

डॉ. व्ही. जे. वारके यांची पत्रकार परिषदेत माहिती

सावदा (प्रतिनिधी) – सावदा येथील “सुश्रुत रुग्णालयात” प्रथमच जर्मन बनावटीची कार्ल स्टार्क कंपनीची उच्च दर्जाची 3D, 4K, ICG यंत्रणा बसवण्यात आली असून, या यंत्राद्वारे आता पोटावरील विविध विकारांवर आधुनिक आणि कमी त्रासदायक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. ही माहिती डॉ. व्ही. जे. वारके, डॉ. सुनीता व्ही. वारके, डॉ. प्रशांत भारंबे व कंपनीचे अधिकारी अमर कुट्टीकोटी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या यंत्रामुळे लेप्रोस्कोपी, आतड्यांचे विकार, अल्सर, पोटाचा कॅन्सर यांसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आता अतिशय अचूक, जलद आणि सुरक्षित पद्धतीने होणार आहेत. पारंपरिक शस्त्रक्रियांच्या तुलनेत यामध्ये वेळ कमी लागतो, रुग्णाला कमी टाके पडतात, त्यामुळे वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरे होतो.

ग्रामीण भागातील रुग्णांसाठी दिलासा : मुंबई, नागपूर, औरंगाबादसारख्या मोठ्या शहरांमध्ये अशा अत्याधुनिक सुविधा अत्यंत मर्यादित ठिकाणीच उपलब्ध आहेत आणि त्याचा खर्चही सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णांसाठी सावदा येथेच ही सेवा उपलब्ध होणे ही एक महत्त्वाची बाब ठरणार आहे.

“ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपचार मिळावेत या उद्देशाने आम्ही ही तंत्रज्ञान सुविधा सुरु केली आहे,” असे डॉ. व्ही. जे. वारके व डॉ. सुनीता व्ही. वारके यांनी सांगितले.

या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात न जाता त्यांच्या गावातच अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मिळणार असून, हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम