सावदा येथील तापी पतसंस्था खाली करण्यासाठी पुन्हा अवसायक यांच्या हालचाली सुरू

बातमी शेअर करा...

सावदा येथील तापी पतसंस्था खाली करण्यासाठी पुन्हा अवसायक यांच्या हालचाली सुरू

तापी अर्बन पतसंस्थेचा ताबा सोडण्यावरून ठेवीदार आक्रमक

सावदा I प्रतिनिधी

सावदा येथील तापी अर्बन ही पतसंस्थे चे सावदा येथील मुख्य कार्यालयाची इमारत खाली करून तेथील सर्व दप्तर रावेर येथे साह्यक निबंधक कार्यालय येथे जमा करण्याचे हालचाली सुरू असून यापूर्वी दि 30 डिसेंबर 2024 रोजी या संस्थेचे अवसायक राहुल मुजुमदार हे येथे येऊन सदर इमारत खाली करण्याचे प्रयत्नात असतांना येथील ठेवीदार यांनी त्यास विरोध केल्याने त्यावेळी ते परत निघून गेले होते.

तथापी सदर पतसंस्थेची इमारत खाली करण्याच्या छुप्या हालचाली संस्थेचे अवसायक राहुल मुजुमदार हे करीत असल्याचे ठेवीदार यांचे लक्षात आल्याने ते याबाबतीत प्रचंड आक्रमक झालेले आहेत यापूर्वी सावदा शहरातून ज्या – ज्या पतसंस्था कार्यालय खाली करून दप्तर साह्यक निबंधक कार्यालय रावेर येथे जमा झाले आहे त्या सर्व ठेवीदार यांचे कोणीही वाली राहिलेला दिसत नाही रावेर कार्यालयात उत्तरे मिळत नाही ठेवी मिळण्याचा पत्ता नाही/

अश्या रीतीने त्यांची अवस्था “तेल गेले तूप गेले हाती धुपाटने राहिले” अशी झालेली असल्याने यातून धडा घेत तापी अर्बन पतसंस्थेचे ठेवीदार यांनी आता ह्या पतसंस्थेचे कार्यालय कोठेही स्थलांतर न होऊ देण्याचा ठाम निर्धार केलेला दिसत आहे त्या मुळे येत्या काही काळात सदर इमारत प्रशासनाचा सहारा घेत जबरजस्ती खाली करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यास ठेवीदार पतसंस्थे समोर आंदोलन करतील अशी स्थिती येथे निर्माण झालेली दिसत आहे.

दरम्यान या पतसंस्थेतुन ठेवीदारांना थोड्या प्रमाणात का होईना आपल्या ठेवी हळू हळू परत मिळत असतांना अचानक जिल्हा निबंधक यांनी तोंडी आदेशाव्दारे सदर पतसंस्था खाली करून घेण्यामागे ठेवीदारांना काहीतरी मोठे षडयंत्र जाणवत असून या मागे जिल्ह्यातील कोणीतरी मोठी राजकीय शक्ती कार्यरत असल्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे.

त्यामुळे या पतसंस्थेतील ठेवीदारांना व-यावर सोडून सदर पतसंस्थेचे कार्यलय खाली करण्याचा अट्टहास केला जात असल्याची देखील चर्चा ठेवीदारांत आहे त्यामुळे येत्या काळात या पतसंस्थे च्या कार्यालय खाली करण्याच्या विषयावर सहकार खाते विरुद्ध ठेवीदार असा संघर्ष उभा राहण्याची देखील शक्यता निर्माण होत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम