
सावदा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन
शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणादायी ठरणार
सावदा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन
शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणादायी ठरणार
सावदा (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील सावदा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारणीसाठी सावदा – फैजपूर रोडवरील साई बाबा मंदिरा जवळील पाटील परीवार यांनी सौजन्य फाउंडेशन यांना जागा दान दिली असून याच जागेवर दि 17 रोजी शिवजयंती चे औचित्य साधून येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीसाठी भूमिपूजन उत्साहात पार पडले, या पुतळ्यासाठी जागा दान करणारे मनोज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास शास्त्री स्वामी विश्वप्रकाश दासजी यांचे अध्यक्षतेखाली साहित्यिक व.पु. होले, नरेंद्र नारखेडे, सपोनि विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे, निवृत्त पोलीस निरीक्षक सुनील वंजारी, चंद्रशेखर पाटील, पंकज येवले, जगदीश बढे, शाम अकोले, जाफर बोहरी, हुसेन शेख, अनिल सरोदे, प्रमोद भंगाळे, जितू चौधरी, हर्षल जावळे, डॉ. चंद्रशेखर पाटील, योगेश भंगाळे, जे. के. भारंबे, महेश अकोले, शिवाजी भारंबे, सिमरन वानखेडे, सुनील राणे, भाऊ धांडे, पत्रकार शहर सह परिसरातील नागरिक मान्यवर उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे विचार आणि पराक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुतळा प्रेरणादायी ठरेल, असे विचार यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम