सावद्यात प्लॅस्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

सावदा नगर पालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मोहीम

बातमी शेअर करा...

सावद्यात प्लॅस्टिक पिशव्या विक्रेत्यांवर कारवाई

सावदा नगर पालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मोहीम
सावदा प्रतिनिधी

सावदा नगर पालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एकल प्लॅस्टिक वापरण्याचे आवाहन करीत प्लॅस्टीक कॅरीबॅग वापरणार्‍या दुकानदारांवर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. मुख्याधिकारी भूषण वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शहरांत प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई सुरू करण्यात आली. मोहिम राबवताना संदीप पाटील, विमलेश जैन, अविनाश पाटील, हमीद तडवी व अरुणा चौधरी आदी कर्मचारी सहभागी झाले.

देशभरात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. या अनुषंगाने सावदा नगरपरिषदेमार्फत सिंगल युज प्लास्टिकबाबत धडक मोहिम राबवली जात आहे. शहरातील सर्व दुकानदार, व्यापारी, नागरिक यांनी प्लॅस्टीक कॅरीबॅगचा वापर टाळावा व तसे आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे, असे नगरपरिषदेने बजावले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम