सावद्यात रंगला भुलाबाईचा सांस्कृतिक महोत्सव

बातमी शेअर करा...

सावद्यात रंगला भुलाबाईचा सांस्कृतिक महोत्सव

जळगाव (प्रतिनिधी) – केशव स्मृती प्रतिष्ठान संचालित ललित कला संवर्धिनी आणि गोदावरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १० सप्टेंबर रोजी सावदा येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात यावल आणि रावेर तालुक्यातील एकूण ११ शाळांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. या विद्यार्थ्यांनी भुलाबाईच्या गीतांवर नृत्य सादर करत विविध सामाजिक संदेश दिले.

मान्यवरांची उपस्थिती

या महोत्सवाला स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी सरोदे, हेमांगी चौधरी, माजी नगराध्यक्षा अनिता येवले, गोदावरी फाउंडेशनच्या मनीषा खडके, शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, भाजप महिला मोर्चाच्या नंदा लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांनी सहभागी संघांना शुभेच्छा पाठवून प्रोत्साहन दिले.

सामाजिक संदेश देणारे सादरीकरण

कार्यक्रमाची सुरुवात स्व. गोदावरी आई पाटील यांना अभिवादन करून, भुलाबाईची आरती आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर, एकामागे एक अशा ११ संघांनी भुलाबाईच्या आणि श्रावण महिन्यातील सणांवर आधारित गीतांच्या तालावर नृत्ये सादर केली. या सादरीकरणातून त्यांनी महत्त्वाचे सामाजिक संदेशही दिले.

या स्पर्धेचे परीक्षण रितू रायसिंघानी, वैशाली गुरव आणि सचिन भिडे यांनी केले. यशस्वी संघांना स्मृतीचिन्ह, रोख रक्कम, टिफिन बॉक्स आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच, सर्व सहभागी संघांना सहभाग प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा तायडे यांनी केले. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूल, सावदा येथील शिक्षकांनी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम