सासरच्या छळाला कंटाळून माहेरी परतलेल्या विवाहितेची तक्रार; पतीसह पाच जणांवर गुन्हा

बातमी शेअर करा...

सासरच्या छळाला कंटाळून माहेरी परतलेल्या विवाहितेची तक्रार; पतीसह पाच जणांवर गुन्हा

भुसावळ | प्रतिनिधी
निफाड (जि. नाशिक) येथील सासरी शिवीगाळ, मारहाण व छळ सहन करत असलेल्या भुसावळच्या न्यू एरिया वॉर्ड येथील एका विवाहितेने अखेर माहेरी येऊन पोलिसात धाव घेतली आहे. याप्रकरणी पतीसह पाच सासरच्यांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित विवाहितेचे नाव विद्या निलेश पगारे (वय ३०) असे असून, तिचा विवाह २०१८ मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील निलेश नामदेव पगारे याच्याशी रितीरिवाजानुसार पार पडला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच तिला विविध कारणांनी मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले.

तक्रारीनुसार, मानपान न दिल्याचा राग मनात ठेवून सासरच्यांनी वेळोवेळी तिला टोमणे मारत शिवीगाळ केली. पती निलेशने देखील मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या सततच्या छळामुळे त्रस्त होऊन विद्या माहेरी भुसावळ येथे परत आली.

२१ मे रोजी रात्री ९ वाजता तिने भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पती निलेश नामदेव पगारे, सासू विजयाबाई पगारे, सासरे नामदेव भिकाजी पगारे, जेठ जीवन पगारे आणि जेठाणी सविता पगारे (सर्व रा. निफाड, जि. नाशिक) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम