साहित्य हि एकलव्याची विद्या-डॉ. संजीव गिरासे

तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन

बातमी शेअर करा...

साहित्य हि एकलव्याची विद्या-डॉ. संजीव गिरासे
तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
जळगाव प्रतिनिधी

साहित्य हि एकलव्याची विद्या असून यामध्ये तुम्हाला कोणी शिकविणारा नसतो त्यामुळे निरीक्षण, समाजभान, वाचन, आणि प्रश्न पडणे हे गुण अंगी असो आवश्यक आहे. त्यातूनच साहित्य निर्मिती होते असे प्रतिपादन म्हसदी येथील स्व. आर.डी.देवरे महाविद्यालयाचे प्राचार्य तथा खान्देशातील सुप्रसिध्द साहित्यिक डॉ. संजीव गिरासे यांनी केले. अमळनेर येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसऱ्या बहिणाबाई विद्यार्थी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते.
विद्यापीठाच्या प्रताप तत्वज्ञान केंद्रात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने तिसरे विद्यार्थी साहित्य संमेलन संमेलन दि. १० मार्च रोजी झाले. उद्घाटनसत्रात अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे होते. यावेळी मंचावर व्य.प. सदस्य प्रा.शिवाजी पाटील, संमेलनाचे कार्याध्यक्ष ॲङ अमोल पाटील, अधिसभा सदस्य स्वप्नाली महाजन, केदारनाथ कवडीवाले, सुनील निकम, ॲङ केतन ढाके, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. ऋषिकेश चित्तम, विद्यार्थी विकास संचालक डॉ. जयेंद्र लकुरवाळे, प्रताप तत्वज्ञान केंद्राचे मानद संचालक प्रा. एस.डी. ओसवाल उपस्थित होते.

डॉ. संजय गिरासे म्हणाले की, समाज मुल्यांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले साहित्य चिरकाल टिकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समाज मुल्यांची जोपासना करणारे लेखन करावे. सतत डोळे व कान उघडे ठेवून सभोवतालच्या घटनांचे निरीक्षण केल्यास विविध पात्रे लेखनासाठी उपलब्ध होतात.

प्रा. एस.टी. इंगळे यांनी विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी किडा न राहता त्यांना साहित्य, क्रीडा व सांस्कृतिक मंच उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटीबध्द आहे. अशा संमेलन व महोत्सवातून कलावंत व साहित्यिक निर्माण होतील अशी अपेक्षा व्यक्त करून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाभिमूख अभ्यासक्रमांची रचना अपेक्षित असल्याचे प्रा. इंगळे म्हणाले. कार्याध्यक्ष ॲङ अमोल पाटील म्हणाले की, अमळनेर शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साने गुरूंजीसारखे साहित्यिक इथे झाले आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी साहित्य संमेलन अमळनेर येथे घेण्याचा निर्णय घेतला.

प्रास्ताविकात डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी संमेलनाची माहिती देवून ३० महाविद्यालयातील १५० विद्यार्थी साहित्यिक यात सहभागी झाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभागाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. संजय पाटील यांनी केले. प्रा. एस.डी. ओसवाल यांनी आभार मानले.

विद्यार्थी रंगले

कवयित्री बहिणाबाई सभागृहात : काव्यवाचन, पुज्य सानेगुरूजी सभागृहात कथाकथन, श्रीमंत प्रतापशेठ सभागृहात बोलीभाषा सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी यासर्व प्रकारात हिरिरीने भाग घेतला. व्य.प. सदस्य नितीन झाल्टे यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी व्य.प. सदस्य राजेंद्र नन्नवरे यांच्यावर होती.

काव्यवाचनात ५० विद्यार्थी सहभागी झाले. आई, शेती, शेतमजूर, जीवन, प्रेम, असे अनेकविध विषय विद्यार्थ्यांनी हाताळले कवितांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सानेगुरूजी सभागृहात झालेल्या : कथाकथनमध्ये ७ विद्यार्थी सहभागी झाले. ग्रामीण जीवन, आदिवासी युवक, आईची आत्मकथा असे विषय विद्यार्थ्यांनी हाताळले.

श्रीमंत प्रतापशेठ सभागृहात : बोलीभाषा सादरीकरणात ९ विद्यार्थ्यांनी भाग घेतला. अहिराणी भाषेत वसतिगृहातील जीवन शेतकरी आणि गाव असे विषय विद्यार्थ्यांनी हाताळले.

या तीनही स्पर्धांचे परीक्षण डॉ. वासुदेव वले, डॉ. प्रशांत लगडे, डॉ. संदीप माळी, डॉ. पंकज देवरे, डॉ.किशोर पाठक, डॉ.डी.डी.गिरासे, डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. मधुचंद्र भुसारे, डॉ. शिवाजी राठोड यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम