सिडबी बँकेचे उदघाटन; MSME क्षेत्राला मिळणार नवे आर्थिक पाठबळ

बँकेच्या उदघाटन प्रसंगी सुमारे 10 कोटींचे कर्ज वितरण 

बातमी शेअर करा...
सिडबी बँकेचे उदघाटन; MSME क्षेत्राला मिळणार नवे आर्थिक पाठबळ

बँकेच्या उदघाटन प्रसंगी सुमारे 10 कोटींचे कर्ज वितरण

जळगांव l प्रतिनिधी
भारतीय लघुउद्योग विकास बैंक (सिडबी) जळगाव शाखेचे उद्घाटन शुक्रवार दि. 27 सप्टेंबर, 2024 रोजी करण्यात आले.

सिडबी

या वेळी प्रमुख पाहुणे माजी आ. डॉ. गुरुमुख जगवाणी, संजय गुप्ता मुख्य महाव्यवस्थापक, सिडबी, दक्षिण आणि पश्चिम विभागीय कार्यालय अहमदाबाद,
यांनी विविध उद्योगपतींना संबोधित केले. आणि सिडबी आणि त्यांच्या योजनांबद्दल थोडक्यात माहीती दिली.
यावेळी अंजनी कुमार श्रीवास्तव, महाव्यवस्थापक, सिडबी, प्रादेशिक कार्यालय पुणे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
सदर कार्यक्रमाला सुमारे 40 लोक उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र एसटोलकर, सह संचालक MSME DFO, माजी आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी, यांनी देखील उपस्थितांना संबोधित केले.
आणि सिडबीची शाखा सुरू झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
मनोज कुमार सहयोगी, उप महाप्रबंधक, औरंगाबाद शाखा कार्यालय यांनी सिडबी आणि त्यांच्या योजनांबद्दल थोडक्यात माहीती दिली.
तसेच कार्यक्रमात काही कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले, त्यापैकी मुख्यतः (1) पाटील बायोटेक प्रा लि.चे प्रमोद पाटील यांना रुपये 229.50 लाख, (2) स्वामी इरीगेशन च्या श्रीमती. जयश्री चौधरी यांना रुपये 229.10 लाख,
(3) एम एन अग्रो इंडस्ट्रीज चे नीलेश सुतारवाला, आयुष सुतारवाला आणि श्रीमती निकिता सुतारवाला
यांना रुपये 300.00 लाख,
(4) साईराम प्लास्टिक आणि ईरीगेशन चे श्रीराम पाटील, प्रमोद पाटील आणि अभिषेक पाटील यांना रुपये 150.00 लाख रुपयांचे कर्ज मंजूर पत्र वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे शाखा व्यवस्थापक संजय गोडे जळगाव यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानले.
बँकेबद्दल थोडक्यात: 
1990 मध्ये स्थापन झाल्यापासून, आपल्या समन्वित, नाविन्यपूर्वक आणि सर्व समावेशक दृष्टीकोनाद्वारे समाजातील विविध स्तरांमधील नागरीकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला आहे.
बँकेने विविध वित्तीय आणि विकासात्मक  उपायांद्वारे सूक्ष्म आणि लघुउद्योगांच्या (MSEs) जिवनावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम केला आहे,
मग ते पारंपारीक, देशांतर्गत लघुउद्योजक असतील, तळागाळातील उद्योजक असतील किंवा उच्च तंत्रज्ञानाधारीत उद्योजक असतील.
अधिक माहितीसाठी, बँकेच्या  https://www.sidbi.in/ या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन केले.

हे ही वाचा👇

अटल भूजल योजनेत सावखेडा बुद्रुक ला जिल्हास्तरीय 50 लाखाचे पहिले तर खिरोद्याला 20 लाखाचे तिसरे बक्षीस

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम