सिद्धीविनायक गोशाळेत वसुबारस निमित्त वंचितांची दिवाळी गोड

बातमी शेअर करा...

सिद्धीविनायक गोशाळेत वसुबारस ननिमित्तवंचितांची दिवाळी गोड
मनवेल ता यावल : दगडी येथील श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्था तसेच प्रेमकांत फाउंडेशन व प्रेमकांत मित्रपरिवार ठाणे यांनी वसु बारसच्या पार्श्वभूमीवर आदिवासी पाड्यांवर मिठाई, कपडे व फराळाचे वाटप केले सरपंच परिषदचे तालुकाध्यक्ष तथा वढोदा सरपंच संदिप सोनवणे याच्या हस्ते गो मातेची पुजा करण्यात आली यावल व चोपडा तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे. दिवाळीत वंचितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. प्रेमकांत फाउंडेशन, प्रेमकांत मित्रपरिवाराने ठाणे येथीलजास्मीन परेश शाह यांच्या मार्गदर्शनाखाली दगडी मनवेल (ता.यावल) येथील श्री सिद्धिविनायक गोसेवा संस्थेकडून दगडी या आदिवासी रहिवाशांना दिवाळी फराळ आणि कपड्यांचे वाटप केले. गोसेवा संस्थेचे अध्यक्ष विनायक सोनवणे, पीप्री सरपंच रोहीदास कोळी , किशोर कोळी, मंगल कोळी ,नरहर भिल, उपस्थित होते या सर्वांनी आदिवासी भगिनींना दिवाळीनिमित्त साड्या, मिठाई भेट दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम