
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा बु.।। माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा
गुरुजनांसोबत शालेय जीवनातील आठवणींना मिळणार उजाळा
सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा बु.।। माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा
गुरुजनांसोबत शालेय जीवनातील आठवणींना मिळणार उजाळा
पिंपळकोठा बु., ;– येथील सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा बु. ता. एरंडोल, जि. जळगाव येथे शालेय २००३-२००४ बॅचच्या माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याचे आयोजन बबन पाटील आणि मिन्न परिवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या मेळाव्यात माजी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. तसेच गुरुजनांसोबत शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत संपूर्ण दिवस आनंदात साजरा करण्यात येणार आहे.
मेळाव्याचा मुख्य उद्देश शालेय जीवनातील आठवणी ताज्या करणे व गुरुजनांच्या आशीर्वादाने पुढील जीवनाचा प्रवास अधिक प्रेरणादायी बनवणे हा असून २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. . या वेळी उपस्थित गुरुजन, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या सुखद अनुभवांचे कथन करावे.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बबन पाटील व मिन्न परिवार तसेच शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेत आहे.
संपर्कासाठी: बबन पाटील – मो. ९७६५६६९१८१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम