सिमेंटच्या गोण्या भरलेले ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच ठार

बातमी शेअर करा...

सिमेंटच्या गोण्या भरलेले ट्रॅक्टर उलटल्याने चालक जागीच ठार
जळगावः शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत शुक्रवारी सकाळी ११ वाजता सिमेंटच्या गोण्यांनी भरलेला ट्रॅक्टर चढावावर उलटल्याने चालकाचा दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गणेश मोरसिंग चव्हाण (वय ४७, रा. भैरव नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे मृत ट्रॅक्टरचालकाचे नाव आहे.

गणेश चव्हाण शुक्रवारी सकाळी त्यांनी रेल्वे मालधक्क्यावरून (ट्रॅक्टर क्रमांक एमपी ६८ ए ०६४६) सिमेंटच्या गोण्या भरल्या होत्या. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ते अनुराग स्टेट बँक कॉलनीतील एकाचढणीवर ट्रॅक्टर घेऊन जात असताना, अचानक त्यांचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटला आणि सिमेंटच्या वजनाने भरलेला ट्रॅक्टर पलटी झाला. या अपघातात गणेश चव्हाण ट्रॅक्टरखाली दाबले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच रामानंद नगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टर बाजूला करून गणेश चव्हाण यांना बाहेर काढले. गंभीर अवस्थेत त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर चव्हाण यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. या संदर्भात रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम