सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कै.गिरिजाबाई नथूशेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय विद्यानगर, पिंप्राळा,जळगाव येथे वैज्ञानिक सर सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

बातमी शेअर करा...

सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
कै.गिरिजाबाई नथूशेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय येथे आयोजन
जळगाव प्रतिनिधी

कै.गिरिजाबाई नथूशेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळा व माध्यमिक विद्यालय विद्यानगर, पिंप्राळा,जळगाव येथे वैज्ञानिक सर सी.व्ही.रामन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुरेखा चौधरी या होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक विभागाच्या मुख्याधापिका सौ.मनीषा कानडे होते.सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते वैज्ञानिक सर सी.व्ही.रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शाळेत विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले,त्यात इयत्ता ५वी ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांची मांडणी केली तसेच इयत्ता ८वी च्या विद्यार्थीनी विविध वैज्ञानिक प्रयोगांची रांगोळीतुन मांडणी केली.विज्ञान प्रदर्शनास विज्ञान शिक्षक श्री.खुशाल पाटील सर यांचे मार्गदर्शन मिळाले.जेष्ठ शिक्षक श्री.संदीप बागुल सर यांनी रामन परिणामाची माहिती सागितली.

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर माहिती सांगितली .अध्यक्षा यांनी अध्यक्षीय भाषणातून मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन श्री.प्रभाकर खराटे सर व आभार सौ.कविता खुरपडे यांनी मानले..कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम