
सी.एस.आर.अंतर्गत आणि रेडक्रॉस आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
दोन्ही दिवसात 496 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
सी.एस.आर.अंतर्गत आणि रेडक्रॉस आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद
दोन्ही दिवसात 496 नागरिकांनी घेतला शिबिराचा लाभ
जळगाव – ओरिएंट सिमेंट लिमिटेड यांच्या सी.एस.आर अंतर्गत आणि इंडियन सोसायटी जळगाव यांच्या सहकार्याने जळगाव खुर्द, या ठिकाणी दोन दिवसीय आरोग्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराच्या दोन्ही दिवशी आरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी 77 जेष्ठ नागरिकांचे शुगर व ब्लड प्रेशर तपासणी, 129 विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी, 69 महिलांची हिमोग्लोबिन तपासणी हि करण्यात आली. या व्यतिरिक्त सर्व स्पेशालीस्ट डॉक्टरांनी विविध आजारांच्या 221 तपासणी करून रुग्णांना औषधी ही दिली. यात 16 नागरिकांना मोतीबिंदू असल्याचे लक्षात आले असून त्यांचे विनामूल्य ऑपरेशन ही करण्यात येणार आहे. तसेच सर्व शालेय विद्यार्थिनी व महिलांना मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करून सॅनिटरी नॅपकिन्स वितरीत करण्यात आले.
या तपासणी शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ओरिएंट लिमिटेड वर्क्सचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अतुल अग्रवाल, रेडक्रॉसचे चेअरमन श्री. विनोद बियाणी, सेक्रेटरी श्री. सुभाष सांखला, सह प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी एच.आर.विभाग प्रमुख श्री. रोहित जोशी यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि, ओरिएंट सिमेंट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून जळगाव खुर्द येथील ग्रामस्थांसाठी आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. वर्क्सचे व्हाईस प्रेसिडेंट श्री. अतुल अग्रवाल यांनी भविष्यातही गावातील नागरिक, मुले, युवक आणि महिलांसाठी असेच सामाजिक उपक्रम राबवले जातील असे आश्वासनही दिले. या तपासणी शिबिरासाठी स्त्रीरोग तज्ञ डॉ. कृष्णा राठोड, , ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. स्नेहल बम्बोडे, दंतरोगतज्ञ डॉ. देवेंद्रप्रताप सिंग, कान नाक घसा तज्ञ डॉ. अरविंद चौधरी, डोळे तपासणी तज्ञ डॉ. गौरव वाबळे, जनरल फिजिशियन डॉ. रोहित काळे या डॉक्टरांनी सेवा दिली. सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टरांचा या सेवेसाठी सर्वांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी ओरिएंट सिमेंटच्या एच.आर.विभागाचे श्री.सुदर्शन मोरे, जळगाव खुर्दचे उपसरपंच श्री. दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्री. गोकुळ सुरवाडे, ग्रामसेवक श्री. सुनील सरदार, तलाठी, सौ. कांचन सुलक्षणे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. रेवानंद पिंपरकर, ज्येष्ठ नागरिक श्री. दत्तात्रय पाटील व मान्यवर उपस्थित होते. या उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभार रेडक्रॉस जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी व्यक्त केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम