सुजदे येथील माजी सभापती  सुनिल मुरलीधर सोनवणे यांचे निधन

बातमी शेअर करा...

सुजदे येथील माजी सभापती  सुनिल मुरलीधर सोनवणे यांचे निधन

जळगाव : जळगाव तालुक्यातील सुजदे येथील रहिवासी आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल मुरलीधर सोनवणे (वय ५२) यांचे रविवारी (दि. २६ ऑक्टोबर २०२५) मध्यरात्री अडीच वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कै. सुनिल सोनवणे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले होते. ग्रामविकास आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या निधनामुळे सुजदे गावासह जळगाव तालुक्यात शोककळा पसरली आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले  प्रभु आणि मोहित, एक मुलगी तसेच पाच भाऊ  अनिल, सचिन, निलेश, नितिन आणि धीरज (मा. नगरसेवक) असा मोठा परिवार आहे. ते डॉ. शांताराम दादा सोनवणे यांचे पुतणे तसेच डॉ. आश्विन सोनवणे (माजी उपमहापौर), इंजि. राहुल सोनवणे आणि अॅड. अमित सोनवणे यांचे चुलत भाऊ होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम