
सुट्टीच्या दिवशी मुख्याधिकारी राहुल पाटील जनतेच्या दारी
सुट्टीच्या दिवशी मुख्याधिकारी राहुल पाटील जनतेच्या दारी
घंटागाडीतून शहरभर मारली फेरी
चोपडा आपल्या कामातून जनतेला भुरळ घालणारे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी आज पुन्हा आपला कामाचा परिचय नागरिकांना करून दिला. स्वच्छता मोहीम योग्य तन्हाने राबवली जात आहे की नाही, याचा आढावा घेण्याच्या दृष्टीने स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत स्वतः घंटागाडीत बसून ५ ते ६ तास पूर्ण शहरभर फेरी मारली. या दरम्यान त्यांनी ठीक ठिकाणी नागरिकांच्या स्वच्छतेबाबत प्रतिक्रिया जाणून घेत उद्भवणाऱ्या समस्यांवर उपायोजना करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले.
चोपडा शहरात मागील दिवसांपासून संतधार पावसामुळे
जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांत रस्त्यांची दूरवस्था, गटारींमध्ये पाणी साचणे व मलनिसारण प्रकल्पामुळे निर्माण झालेली तात्पुरती गैरसोय, अशा अडचणींचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. यामुळे प्रशासनाचे नेतृत्व काय करतंय, असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण होत होते. तेव्हा शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी चोपडा नगर परिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल पाटील यांनी २८ रोजी सकाळी ६ वाजता थेट घंटागाडीतून शहराचा दौरा सुरू केला. त्यांनी शहरातील एस. टी. कॉलनी, महावीर नगर, रामनगर, झोपडपट्टी परिसर, विवेकानंद नगर, यश पार्क या परिसरात सलग ५ तास ओला व
सुका कचरा जनजागृती मोहिम राबवली. तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या, तर समस्या ऐकून तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले, स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत स्वतः घंटा गाडीत बसून स्वच्छतेवाचतच्या समस्या मुख्याधिकारी राहुल पाटील ऐकून घेऊन उपाययोजना केल्याच्या कृतीचे शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम