
सुयोग सोनवणे याची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड
पंच म्हणून अनिल कोळी यांची नियुक्ती
सुयोग सोनवणे याची महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये निवड
पंच म्हणून अनिल कोळी यांची नियुक्ती
जळगांव : जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशन व कैलास क्रीडा मंडळ, जळगाव चा खेळाडू सुयोग दिनेश सोनवणे याची अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यमाने ३४ वी किशोर-किशोरी गट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे दोघं संघ जाहिर करण्यात आलेले असून त्यामध्ये सुयोग सोनवणे याची संघात निवड करण्यात आलेली आहे. तर पंच म्हणून अनिल कोळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुयोग सोनवणे हा काशिबाई उखाजी कोल्हे विद्यालय, जळगाव चा विद्यार्थी आहे. बिहार गया येथे जी.डी. गोयंका पब्लीक स्कुल रसलपूर येथे मॅट वर सदरील कबड्डी सामने घेण्यात येणार आहे. नुकताच मनमाड-नाशिक येथे झालेल्या किशोर-किशोर राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला असून मनमाड येथे सराव करीत आहे. निवड झालेला संघ हा मुंबई येथून छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावरुन रात्री स्पर्धेकरिता रवाना होणार आहे. या संघाच्या निवड समितीमध्ये जळगाव चे सुनिल राणे (सर) यांनी काम पाहिले.
निवड झालेला संघ खालीलप्रमाणे
आर्यन पवार (परभणी), तुकाराम दिवटे (जालना), सारंग उंडे (नंदुरबार), मनिष काळजे (पिंपरी चिंचवड), किशोर जगताप (परभणी), विश्वजीत सुपेकर (धाराशिव), ऋतुराज महानवर (पिंपरी चिंचवड), श्रेयस लाले (रत्नागिरी), निखील गायकर (ठाणे ग्रामीण), समर्थ ठोंबरे (कोल्हापूर) सुयोग सोनवणे (जळगांव), किरण कोळी (पुणे शहर) या संघासाठी संघ प्रशिक्षक संग्राम मोहिते, (धाराशिव), तर संघ व्यवस्थापक वाल्मिक बागुल (मनमाड) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
तरी निवड झालेल्या खेळाडूला जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष . शाम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, खजिनदार सुनिल राणे, तसेच कैलास मंडळाचे अध्यक्ष शरद तायडे, कार्याध्यक्ष अमित काळे, का. ऊ. कोल्हे विद्यालयातील मुख्याध्यापक श्री. एस. जी. खडके सर आदिंनी अभिनंदन केलेले आहे. सदर खेळाडूस कमलेश पाटील व योगेश बारी यांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेसाठी पंच म्हणून अनिल कोळी यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे राष्ट्रीय पंच व नेताजी सुभाष मंडळाचे प्रशिक्षक अनिल सुभाष कोळी यांची अखिल भारतीय कबड्डी महासंघाच्या मान्यतेने बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या विद्यामाने ३४ वी किशोर-किशोरी गट स्पर्धेसाठी पंच म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन तर्फे करण्यात आलेली असून अनिल कोळी यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे.
तरी पंच म्हणून निवड झालेले अनिल कोळी यांचे जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष मोहनराव भावसार, कार्याध्यक्ष शाम कोगटा, सरकार्यवाह नितीन बरडे, खजिनदार सुनिल राणे व असोसिएशनचे सर्व पदाधिकारी तसेच नेताजी सुभाष क्रीडा मंडळ, जळगांव, तरुण कुढ़ापा मित्र मंडळ, जळगाव यांचेकडून शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम