सूरसंगम तर्फे शास्त्रीय गायिका सौ.सुनीता टिकारेंच्या स्वरसंध्येचे आयोजन

सुरेल शास्त्रीय गायन व सुगम संगीताची रसिकांना मेजवानी

बातमी शेअर करा...

सूरसंगम तर्फे शास्त्रीय गायिका सौ.सुनीता टिकारेंच्या स्वरसंध्येचे आयोजन
सुरेल शास्त्रीय गायन व सुगम संगीताची रसिकांना मेजवानी

जळगाव प्रतिनिधी शहरातील संगीत रसिकांच्या सेवेत नव्या दमाने एकापाठोपाठ दर्जेदार संगीत कार्यक्रमांचे उत्स्फूर्त आयोजन करीत अल्पावधीत विशेष स्थान प्राप्त केलेल्या व नव्या पिढीतील उदयोन्मुख कलावंताना प्रोत्साहित करणाऱ्या सूर संगम संगीत मंचातर्फे दि.२८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ वाजता स्वरसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका गान सरस्वती स्व.किशोरी आमोणकर यांच्या मुंबई येथील शिष्या सौ.सुनीता टिकारे ह्या आपल्या सुरांच्या मैफिलीतून शास्त्रीय गायन व सुगम संगीताचे सादरीकरण करणार आहेत.

अ.भा.औषधी विक्रेता संघ व महाराष्ट्र राज्य औषधी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केमिस्ट हृदयसम्राट मा.आ.जगन्नाथ शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढ दिवसा निमित्त सुरसंगम मंचातर्फे हा कार्यक्रम आयोजित तर जळगाव जिल्हा मेडीसीन डीलर्स असोसिएशन तर्फे प्रायोजित करण्यात आला आहे .तसेच ला.ना. शाळा जळगाव व नंदादीप अभासिका यांचे विशेष सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले आहे.

वरील स्वरसंध्येचा कार्यक्रम २८ जानेवारी मंगळवार रोजी सायंकाळी ७ वाजता भैय्यासाहेब गंधे हॉल येथे वेळेवर सुरू होणार असून संगीत रसिकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार आहे.

तरी शहरातील सर्व संगीत प्रेमी रसिकांनी या स्वरसंध्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरसंगम संगीत मंचातर्फे श्री नितीन बापट,पियूष रावळ, प्रवीण गगडाणी,दुष्यंत जोशी, नंदू पाटील , प्रा राजेंद्र देशमुख,प्रल्हाद चौधरी, विशाल भावसार ,प्रसाद जोशी,संपदा छापेकर, विशाखा देशमुख , विद्या भंगाळे यांनी केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम