सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे चित्रकला स्पर्धा : लहानग्यांनी रेखाटले पर्यावरण, इंधन व जलसंवर्धनाचे संदेश

बातमी शेअर करा...

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे चित्रकला स्पर्धा : लहानग्यांनी रेखाटले पर्यावरण, इंधन व जलसंवर्धनाचे संदेश

जळगाव – हिंदी महिना आणि सतर्कता अभियानाच्या निमित्ताने सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे जळगाव शहरातील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, पर्यायी इंधन, जलसंकल्पना आदी विषयांवर आकर्षक चित्रे रेखाटून सर्वांचे मन जिंकले.

या उपक्रमात प्राथमिक स्तरावरील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. मुलांच्या कल्पकतेतून आणि रंगांच्या माध्यमातून सामाजिक संदेश उमटताना पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमास बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्री. हर्षल भगत उपस्थित राहून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना भ्रष्टाचाराविरुद्ध जागरूकतेचा संदेश दिला. त्यांनी पर्यावरणपूरक उपक्रम आणि बँकेच्या हरित अभियानाची माहितीही दिली.

विजेत्यांची निवड विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती निलीमा जी यांनी केली. चौथी इयत्तेतून प्रथम, तिसरी इयत्तेतून द्वितीय व तृतीय तर दुसरी आणि पहिली इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतून सेंट्रल बँक ऑफ इंडिया वेळोवेळी समाजाशी नाते दृढ करत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम