सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

बातमी शेअर करा...

सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर्फे चित्रकला स्पर्धेचे आयोजन

जळगाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय, जळगाव यांच्या वतीने सतर्कता जागरूकता अभियान अंतर्गत विद्यालय स्तरावरील चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जागरूकता, प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव तसेच कला कौशल्याला प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू होता.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी क्षेत्रीय कार्यालयाचे सतर्कता अधिकारी प्रशांत प्रकाश, राजभाषा अधिकारी आशीष कुमार व सहायक प्रबंधक मयूर ठाकूर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच संस्थाध्यक्ष डॉ. दादासो पाटील, माननीय सूर्यकांत पाटील, प्रबोधन संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय बोरसे सर आणि विकास तंत्रनिकेतनचे प्राचार्य अनंत महाजन सर यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धेत उत्कर्ष मंदबुद्धी विद्यालय आणि प्रौढ मंदबुद्धी संरक्षित कार्यशाळेतील विशेष मुलांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. मुलांनी आपल्या कल्पनांना रंगांच्या माध्यमातून कॅनव्हासवर साकारत आनंद व्यक्त केला. त्यांच्या सृजनशीलतेने उपस्थित प्रेक्षक आणि मान्यवर भारावून गेले.

स्पर्धेनंतर विजेत्या विद्यार्थ्यांना अतिथींच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. पुरस्कार स्वीकारताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदी हास्य विशेष लक्षवेधी ठरले.

या माध्यमातून विशेष मुलांना आपली कला आणि प्रतिभा सादर करण्याची तसेच आत्मविश्वास वाढविण्याची संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळते आणि समाजाबद्दलची जागरूकता तसेच आत्मनिर्भरतेची भावना दृढ होते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम