सेवानिवृत्ती जवळ, पण खरातांचा भ्रष्टाचाराचा खेळ बिनधास्त!

सर्वेच अधिकारी पैसे खातात, मी खाल्ले तर काय चुकीचे?

बातमी शेअर करा...

सेवानिवृत्ती जवळ, पण खरातांचा भ्रष्टाचाराचा खेळ बिनधास्त!

सर्वेच अधिकारी पैसे खातात, मी खाल्ले तर काय चुकीचे?

जळगाव / प्रतिनिधी

जिल्हा परिषदेत गेल्या काही वर्षांपासून अधिकारी राज सुरु असल्याने प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मनमानी कारभार करीत भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. एरंडोल उप विभागातील खरात आणि थोरात या अभियंत्यांनी तर बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवरच टांगली आहेत. याला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित या प्रकरणाला अंकुश लावतील का? असा प्रश्न ग्रामीण भागातील पुढाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या विळख्यात अडकल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अभियंत्यांना फावत आहे. एरंडोल येथील उपविभागीय अभियंता सुशील खरात आणि शाखा अभियंता योगेश थोरात यांनी 15 व्या वित्त आयोगाच्या निधीत भ्रष्टाचार करण्यात मुसंडी मारली आहे. एरंडोल व पारोळा तालुक्यातील बहुतेक ग्राम पंचायतीच्या बांधकामात अनियमितता असून व गैरव्यवहार झाल्याचा खरात व थोरात या गोड – जोडीवर आरोप होत आहे.

सेवानिवृत्ती
सेवानिवृत्ती

उप विभागीय अभियंता सुशील खरात यांच्या अखत्यारीत असलेल्या कामांचा संपूर्ण कारभार शाखा अभियंता योगेश थोरात यांच्या इच्छेप्रमाणे चालत आहे. नियमबाह्य आणि सगळ्यांना टक्केवारी वाटपाच्या सूत्राने कामे केली जात असल्याने ही जोडी चर्चेचा विषय बनली आहे. विशेष म्हणजे, सुशील खरात यांची शासकीय सेवा समाप्ती (सेवानिवृत्ती) जवळ असूनही ते बिनधास्त टक्केवारीचा खेळ खेळत आहेत.

गुन्हेगारी प्रकरण असूनही ‘डॅशिंग’ स्टाईल!

योगेश थोरात यांच्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असूनही त्यांना अंतरिम जामीन मिळाला आहे. मात्र, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही ते निर्भयपणे आपल्या प्रभावाचा वापर करत आहेत. एरंडोल आणि पारोळा तालुक्यातील बहुतांश विकासकामे त्यांच्या मर्जीनेच होत असल्याचे बोलले जाते.

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची खुलेआम लूट

पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून होणाऱ्या कामांमध्येही मोठ्या प्रमाणात गोंधळ आणि गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे. ग्रामपंचायतींना निधी मंजुरी, अंदाजपत्रक, वर्क ऑर्डर व बिल वाटप करण्याचे अधिकार उपविभागीय स्तरावर असल्याने थेट या गोड – जोडीनेच सगळी सूत्रे हाताळली आहेत.

‘कमिशन राज’चा थेट फायदा वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही?

खरात आणि थोरात जोडीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विकासकामांमध्ये कमिशनचा ‘खास हिशोब’ ठेवला आहे. यामधून कार्यकारी अभियंता सुनील पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मोठा हिस्सा पोहोचत असल्याची चर्चा आहे. परिणामी, जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या एरंडोल उपविभागात निधी वाटप कामकाजाची अक्षरशः उधळपट्टी केली जात आहे.

जनतेच्या पैशांचा खेळ असाच सुरू राहणार का?

एरंडोल आणि पारोळा तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी असलेल्या निधीचा गैरवापर होत असल्याने याकडे जबाबदार अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. पण हा ‘खास गेम’ सुरूच राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!

 

कमिशन खोरीचा पर्दाफाश; उप अभियंत्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

कमिशन खोरीच्या प्रकरणात उप विभागीय अभियंता सुशील खरात यांनी मोठाच ‘कमिशन बॉम्ब’ एका जवळच्या व्यक्तीजवळ खासगीत बोलतांना केला असून, मी कमिशन खाल्ले तर त्यात काय नवल? सर्वच अधिकारी कमिशन खातात आमचे कार्यकारी अभियंता तथा काम वाटप समितीचे सदस्य सचिव सुनील पाटील, काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी व काम वाटप समितीचे अलिखित अध्यक्ष श्री. लोखंडे हे देखील मोठ्या प्रमाणावर कमिशन खात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित या प्रकरणी काय भूमिका घेतात या कडे लक्ष लागून आहे.

हे ही वाचा👇

छेडखानी प्रकरणी समस्त लेवा पाटीदार पंच श्रीराम मंदिर संस्थानची कारवाईची मागणी

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम