
सेवानिवृत्त सैनिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
यावल तालुक्यातील नावरे येथील घटना
सेवानिवृत्त सैनिकाचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन
यावल तालुक्यातील नावरे येथील घटना
यावल प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या नावरे येथील मूळ रहिवासी असलेले सेवानिवृत्त सैनिक (आर्मी रिटायर ) जितेंद्र पांडुरंग पाटील (वय-४३) यांचे दि.२३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हृदयविकाराचा झटक्याने पटियाला (पंजाब) येथे दुःखद निधन झाले.ते एका महिन्यापूर्वीच आपल्या देशाच्या संरक्षणसेवेतून सेवानिवृत्त झालेले होते व सध्या पटियालाला त्यांचा रहिवास होता.या अकस्मात घडलेल्या दुःखद घटनेने साकळीसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांची दि.२४ मार्च रोजी नावरे या गावी शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी नावरे गावासह परिसरातील लोकप्रतिनीधी , अधिकारी, विविध पक्षाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पत्शांत पत्नी, दोन मुले,आई,मोठे भाऊ असा परिवार आहे.
साकळी वीज वितरण कार्यालयाचे वीज कर्मचारी नितीन पांडुरंग पाटील तसेच शिवाजी अजबराव पाटील यांचे मोठे बंधू तर साई जितेंद्र पाटील,मयुर जितेंद्र पाटील यांचे वडील होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम