
सेवा शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर: तीन शिक्षकांचा सन्मान
चोपडा (प्रतिनिधी) – ५ सप्टेंबर, शिक्षक दिनाच्या निमित्ताने दिला जाणारा आणि शिक्षकांच्या योगदानाला गौरवलेला ‘सेवा शिक्षक गौरव पुरस्कार’ या वर्षी तीन शिक्षकांना जाहीर झाला आहे. सुमारे २४ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने माध्यमिक विभागासाठीचे शिक्षक पुरस्कार बंद केल्यानंतर, चोपडा येथील सेवाभावी शिक्षकांनी एकत्र येऊन ‘सेवा शिक्षक मंडळामार्फत’ हा पुरस्कार सुरू केला.
सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक विलास पं. पाटील आणि डी. पी. पाटील (खेडीभोकरीकर) यांच्या परिवारातर्फे मातोश्री शांताई व पिताश्री पी. के. पाटील यांच्या सन्मानार्थ हा पुरस्कार तीन विभागांत प्रदान केला जातो. या पुरस्काराचे हे २४वे वर्ष आहे.
या वर्षीचे पुरस्कार प्राप्त करणारे शिक्षक असे आहेत:
- परीक्षित निबांजी चव्हाण, जिल्हा परिषद शाळा, कोळंबा (प्राथमिक विभाग)
- पवन लाठी, विवेकानंद प्राथमिक विद्यालय (विषय शिक्षक, माध्यमिक विभाग)
- पंकज छगन पाटील, ना. शि. पाटील माध्य. विद्या मंदिर, चहार्डी (संगीत विभाग)
या पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन करताना सेवा शिक्षक मंडळाचे संस्थापक व सेवानिवृत्त मुख्याध्यापक विलास पाटील, निवृत्त मुख्याध्यापक एच. बी. मोरे, निवृत्त पर्यवेक्षक साहेबराव पाटील, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मंगेश भोईटे, संजय बारी, योगेश चौधरी, आणि इतर सदस्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम