
सैनिकांसाठी सढळ हस्ते मदतीचा हात : निवृत्त शिक्षकाकडून ४५३७०/- रुपयांची स्वेच्छा देणगी
सैनिकांसाठी सढळ हस्ते मदतीचा हात : निवृत्त शिक्षकाकडून ४५३७०/- रुपयांची स्वेच्छा देणगी
जळगाव, प्रतिनिधी
राष्ट्रसेवेचा वारसा जीवनपद्धती म्हणून जपणारे गौरीशंकर माध्यमिक विद्यालय, रवंजे (ता. एरंडोल) येथील निवृत्त शिक्षक श्री. राजेंद्र प्रतापसिंग पाटील यांनी आपल्या निवृत्त वेतनातील एक महिन्याचे वेतन सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस स्वेच्छेने देऊन राष्ट्रप्रेमाचे प्रेरणादायी उदाहरण सादर केले आहे.
श्री. पाटील (रा. आदर्श नगर, एरंडोल) यांनी रु. ४५,३७०/- चा धनादेश निवासी उपजिल्हाधिकारी श्री. गजेंद्र पाटोळे यांच्याकडे सुपूर्त केला. देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांच्या सेवेसाठी सामान्य माणसानेही आपली जबाबदारी मानून योगदान द्यावे, या भावनेतून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेला हा निर्णय संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या राष्ट्रभक्तीपर कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर (डॉ.) निलेश प्रकाश पाटील (नि.) यांनी श्री. पाटील यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक केले आहे.
—

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम