सैनिकी स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याचे स्वप्न उरात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली AISSEE 2025 परीक्षा

473 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

बातमी शेअर करा...

सैनिकी स्कूलमध्ये ऍडमिशन घेण्याचे स्वप्न उरात बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिली AISSEE 2025 परीक्षा

473 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली

 

जळगाव नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा देशभरात महत्त्वपूर्ण परीक्षांचे आयोजन केले जाते . यांच्यामार्फतच देशभरात सर्व महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा पार पाडण्यासाठी विविध स्तरावर पदाधिकाऱ्यांची सोबतच परीक्षा कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाते . के.सी.ई.सोसायटी संचलित ओरायन सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या सौ. सुषमा कंची यांची सिटी कॉर्डिनेटर म्हणून नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रन्स एक्झाम परीक्षेसाठी नेमणूक करण्यात आलेली होती.

सैनिकी स्कूलच्या इयत्ता सहावी आणि नववीच्या प्रवेशासाठी लागणाऱ्या ह्या महत्वपूर्ण परीक्षेची काठिण्य पातळी अतिशय कठीण मानली जाते .या प्रवेश परीक्षेचे आयोजन यावर्षी   5 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलेले होते. यामध्ये 473 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. महत्त्वाची बाब म्हणजे परीक्षा सेंटरवर परीक्षा व्यवस्थित रित्या आणि इतर कोणताही गैरप्रकार न होता सुरळीतपणे पार पडली. परीक्षेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे ठरवून दिलेल्या प्रमाणे पूर्ण गोपनीयतेचे पालन करण्यात आलेले होते.

परीक्षा केंद्रावर .सिटी कॉर्डिनेटर त्यांच्यासोबत ऑब्झर्वर श्री. उज्वल पाटील त्याचबरोबर सुपरवायझर आणि पुरेसा ऑफिस स्टाफ अशी कर्मचारी यंत्रणा कार्यान्वित होती . सुरक्षिततेच्या दृष्टीने परीक्षा सेंटरवर सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली होती . त्याचबरोबर सिटी कॉर्डिनेटर ते एक्झाम सेंटर यांच्यापर्यंत पेपर डिस्ट्रीब्यूशन साठी सुद्धा नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारे नियोजनबद्ध टाईम ठरवून देण्यात आलेला होता त्याच बरोबर उत्तर पत्रिका कलेक्शन साठी एनव्हलपचे रंग देखील ठरवून देण्यात आलेले होते आणि त्यानुसारच सर्व कामगिरी पार पडली .

त्याचप्रमाणे पेपरांबद्दल पूर्ण गोपनीयता बाळगली जात होती . या परीक्षेच्या बाबतीत पूर्वतयारी म्हणून सिटी कॉर्डिनेटर प्राचार्या सौ.सुषमा कंची यांनी 4 मे 2025 रोजी एका ब्रिफिंग सेशनचे आयोजन केलेले होते .ज्यामध्ये प्राचार्या सौ. सुषमा कंची यांनी त्यांच्यासोबतचा असलेला ऑफिस स्टाफ यांना परीक्षे संबंधित माहिती देऊन त्यांची परीक्षेत संबंधित भूमिका काय असेल याबद्दल स्पष्ट माहिती दिली व त्यांच्या शंकांचे निरसन केले.

परीक्षे दरम्यान फ्लाईंग व्हिजिटसाठी स्कॉड कमिटी नेमण्यात आलेली होती . संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे आणि समन्वयक शशिकांत वडोदकर सर यांनी परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेमार्फत लागणारे सर्व साहित्य वेळोवेळी उपलब्ध करून दिले आणि परीक्षेच्या आयोजनासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या.अशा पद्धतीने प्राचार्या सौ. सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्या सौ. मेघना राजकोटिया आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने ही परीक्षा सुरळीतपणे पार पडली

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम