शहर पोलीस ठाण्यात गुन्हा
जळगाव;- बांधकामाचे साईला लागणारे प्लायवुड घेवून ७७ लाख ८५५ रूपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली असूनशिवाजी नगरातील सॉमिल व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भावेश पुरूषोत्तम पटेल वय ३८ रा. आदर्श नगर, जळगाव यांचे छत्रपती शिवाजी नगरात हनुमान विजय स्वामील दुकान असून आहे. आसीफ भाई रा. विवरे ता.रावेर याने २८ नोव्हेंबर २०२४ रोजी भावेश यांच्या स्वामीलवर येवून विश्वास संपादन करून ७७ हजार ८५५ रूपये किंमतीचे बांधकामासाठी लागणारे सेंटींग प्लायवूड विकत घेतले. त्यानंतर भावेश पटेल याला पैसे दिले नाही. पैशांची वारंवार मागणी करूनही कोणताही परतावा दिला नाही. म्हणून भावेश पटेल यांनी गुरूवारी ९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आसिफ भाई रा.विवरे ता.रावेर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रफुल्ल धांडे हे करीत आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम