सोन्याच्या लुटीप्रकरणी दोघांना अटक ; २० ग्रॅम सोने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बातमी शेअर करा...

सोन्याच्या लुटीप्रकरणी दोघांना अटक ; २० ग्रॅम सोने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव प्रतिनिधी

जळगाव शहरातील सोन्याच्या लुटीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २० ग्रॅम सोने जप्त केले असून, आरोपींना पुढील तपासासाठी रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल सोन्याच्या लुटीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून दोन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.
अबरार हमीद खाटीक (रा. उमर कॉलनी, जळगाव) , समीर शेख सलीम (रा. हुडको, पिंप्राळा, जळगाव) अशी आरोपींची नावे आहेत .
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम