
सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठकशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन
रविकांत तुपकर करणार आंदोलनाची घोषणा…!
सोमवारी पुण्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेची राज्यव्यापी बैठकशेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर होणार मंथन
रविकांत तुपकर करणार आंदोलनाची घोषणा…!
बुलढाणा (प्रतिनिधी)
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या बुलढाण्यात झालेल्या वादळी बैठकीनंतर आता पुण्यात राज्यव्यापी बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत विचार – मंथन केले जाणार आहे. पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार असून शेतकरी यावेळी नव्या आंदोलनाची घोषणा देखील करू शकतात, त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण ठरवणार असून या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष राहणार आहे.
शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर यांची मुलुख मैदानी तोफ सोमवार 3 मार्च रोजी पुण्यात धडाडणार आहे. श्रमिक पत्रकार भवन, गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे सकाळी नऊ वाजता ही बैठक होणार आहे. या राज्यव्यापी बैठकीला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा, सोयाबीन- कापूस भावफरक, नाफेड मध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान, ऊस, कांदा, दूध यासह इतर विषयांवर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.
राज्यभरातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे त्याच अनुषंगाने शेतकरी नेत्याला एकांत उपकर यांनी या बैठकीच्या आयोजन केले असून त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते पुण्यात पोचणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागणी आणि समस्यांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली जाणार आहे. राज्यात मोठे आंदोलन छेडणारा असा इशारा यापूर्वीच रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे,
त्यामुळे पुण्यात होणाऱ्या या राज्यव्यापी बैठकीत रविकांत तुपकर नेमके काय बोलतात आणि कोणत्या आंदोलनाची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे. शिवाय क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या राज्याच्या कोअर कमिटीची तसेच प्रदेशाध्यक्ष व इतर महत्त्वपूर्ण पदांच्या नियुक्तीची घोषणा देखील रविकांत तुपकर या बैठकीत करणार आहेत.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा पहिला प्रदेशाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी राज्यभर चळवळ मजबूत करण्याचा निर्धार केला असून त्यासाठी ते आता प्रमुख पदाधिकारी म्हणून कोणत्या कोणत्या शरीरांचे निवड करतात हे तीन मार्च रोजी सर्वांसमोर येणारच आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम