सोलार प्लँटच्या कामासाठी जमीन सपाटीकरणाचे आमिष; तब्बल २.०५ लाखांचा गंडा

बातमी शेअर करा...

सोलार प्लँटच्या कामासाठी जमीन सपाटीकरणाचे आमिष; तब्बल २.०५ लाखांचा गंडा

जळगाव : कानळदा (ता. जळगाव) येथील आनंदा दगडू सपकाळे (वय ३९) यांना सोलार प्लँटसाठी जमिनीचे सपाटीकरण व झाडझुडपे काढून देण्याचे काम मिळवून देतो, असे सांगून तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांत फसवले गेले. यासाठी हैदराबाद येथील मेघा इंजिनिअरिंग कंपनीचा सर्व्हेअर सोपान पोखरकर याने सपकाळे यांच्याकडून रक्कम घेतली, मात्र नंतर कोणतेही काम मिळवून न देता गायब झाला. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सपकाळे यांनी पोलिसांत धाव घेतली. तालुका पोलिसांनी पोखरकरविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम