
सौर प्रकल्पाची डीसी केबल चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
सौर प्रकल्पाची डीसी केबल चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव प्रतिनिधी – बोरनार गावात बसविलेल्या सौर उर्जा प्रकल्पातील २५०० मिटर लांबीची डीसी केबल चोरट्यांनी चोरी केली, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना रविवारी, २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली, तर या प्रकरणी शनीवारी, २९ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
प्रकल्प संचालक सुशिल सुनिल पाटील (वय २६, रा. लोणी, ता. जामनेर, ह. मु. प्रेमनगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर उर्जा प्लेटला जोडलेली १ लाख २० हजार रुपये किंमतीची डीसी केबल चोरी झाली आहे. तसेच प्रकल्पातील जंक्शन बॉक्स तोडले गेले असून, त्याचेही नुकसान झाले आहे. ही घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटे लक्षात आली आणि तत्काळ तक्रार दाखल करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पोहेकॉ ईश्वर लोखंडे हे तपास करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम