स्क्युलर सर्जरीवरील  शैक्षणिक चर्चासत्र संपन्न

बातमी शेअर करा...
स्क्युलर सर्जरीवरील  शैक्षणिक चर्चासत्र संपन्न
जळगाव – आयएमए जळगावच्या वतीने  व रुबी हॉल क्लिनिक पुणे यांच्या सहकार्याने करंट प्रॅक्टिसेस इन मॅनेजिंग व्हॅस्क्युलर डिसेस या विषयावर  शैक्षणिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे येथील व्हॅस्क्युलर सर्जन डॉ. डी. आर. कामेरकर यांनी हायब्रीड सर्जरी इन टुडेज इंडोव्हॅस्क्युलर इरा  या विषयावर तर डॉ. अमित राणे यांनी एव्ही एक्सेस फोर होमो डायलिसिस पेशंट या विषयावर अभ्यासपूर्ण माहिती देत मार्गदर्शन केले.
     यावेळी व्यासपीठावर आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.शशिकांत गाजरे, सचिव डॉ.भरत बोरोले, डॉ.विलास भोळे, डॉ.स्नेहल फेगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. नीलम पाटील यांनी नियोजन तर डॉ. मेधावी चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. चर्चासत्रास शहरातील १०० डॉक्टरांची उपस्थिती होती.
बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम