स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध

बातमी शेअर करा...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध

मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी नागरिकांसाठी विशेष संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

नागरिक https://mahasecvoterlist.in/
या संकेतस्थळावर जाऊन आपले नाव जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा नगरपरिषद/नगरपंचायतीच्या प्रारूप मतदार यादीत शोधू शकतात.

राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ हा अधिसूचित दिनांक निश्चित केला असून, त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

त्याच आधारे तयार करण्यात आलेल्या मतदार याद्या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी विभागनिहाय आणि निर्वाचक गणनिहाय,
नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्रभागनिहाय उपलब्ध आहेत. या याद्या पाहण्यासाठीची लिंक राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर https://mahasec.maharashtra.gov.in/ देखील दिली आहे.

याशिवाय, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात, तर नगरपरिषद व नगरपंचायतींच्या यादीची प्रत त्यांच्या कार्यालयात पाहता येईल. नागरिकांना यादीची प्रत घेण्यासाठी प्रत्येक पृष्ठासाठी दोन रुपये शुल्क भरावे लागेल.

राज्य निवडणूक आयोगाने नागरिकांना मतदार यादीतील माहिती तपासण्याचे आणि आवश्यक दुरुस्त्या वेळेत करण्याचे आवाहन केले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम