
स्नेह,पवित्रता तसेच विश्वासाचे रक्षण करणारा सण म्हणजे रक्षाबंध्ान ….माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
स्नेह,पवित्रता तसेच विश्वासाचे रक्षण करणारा सण म्हणजे रक्षाबंध्ान ….माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा
खामगाव :- रक्षाबंध्ान हा भारत देशातील अत्यंत महत्वाचा सण आहे. हा सण दरवष्ा श्रावण महिन्यातील पोर्णिमेला देशभरात उत्साहात साजरा केला जातो. क्षत्रिय राजपुत समाजामध्येही रक्षाबंध्ानाचे फार मोठे महत्व असुन गेल्या अनेक वर्ष्ाापासून रक्षाबंध्ान सण परंपरेनुसार साजरा केला जात असतो. रक्षाबंध्ान हा सण भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण आहे. जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ-बहिणीचे प्रेम हे निस्वार्थ व पवित्र असते. रक्षा म्हणजे रक्षणकार,बंध्ान म्हणजे ध्ाागा. रक्षणासाठी बांध्ालेला पवित्र ध्ाागा म्हणजे रक्षाबंध्ान होय. या दिवशी बहिण भावाच्या कपाळावर टिळा लावुन त्याच्या मनगटावर राखी बांध्ाते, बहिण भावाला ओवाळते. भावाच्या सुखी,समृध्दी, निरोगी जीवनासाठी ती मनोमन प्रार्थना करते. भाऊही बहिणीला रक्षण करण्याचे वचन देतो. शनिवार दि.09 ऑगस्ट 2025 रोजी रक्षाबंध्ानाचा पवित्र सण सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. सानंदा निकेतन येथेही सानंदा परिवाराच्या वतीने कौटुंबिक रक्षाबंध्ान कार्यक्रम पार ला.यावेळी समाजभूष्ाण तथा सुप्रसिध्द उद्योगपती राणा गोकुलसिंहजी सानंदा, माजी नगराध्यक्ष राणा अशोकसिंह सानंदा, सहकार मित्र राणा राजेंद्रसिंह सानंदा,माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,उद्योजक राणा मुकेशसिंह सानंदा यांच्यासह सानंदा परिवारातील सदस्यांनी बहिणीकडुन राखी बांध्ाली. माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी रक्षाबंध्ान हा स्नेह,पवित्रता तसेच विश्वासाचे रक्षण करणारा सण आहे असे सांगुन रक्षाबंध्ान सणाच्या शुभेच्छा दिल्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम