स्व. सईद मलिक यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णालयात फूड पॅकेट वाटप

सईद मलिक यांच्या कार्याचा आढावा सादर

बातमी शेअर करा...

स्व. सईद मलिक यांच्या पुण्यतिथी निमित्त रुग्णालयात फूड पॅकेट वाटप
जळगाव प्रतिनिधी
सईद मलिक उर्फ सईद बावां यांच्या तेराव्या पुण्यतिथी दिनानिमित्त मलिक फाउंडेशन तर्फे नदीम मलिक यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी ६०० फूड पाकीट वाटून मृतात्म्यास चिरशांती ची प्रार्थना केली.

फारुक शेख यांनी यावेळी सईद मलिक यांच्या कार्याचा आढावा सादर केला व त्यांच्यासाठी मगफीरत साठी दुवा करण्याचे आवाहन केले.

नदीम मलिक यांनी सईद बावा यांनी सुरू केलेल्या सामाजिक कार्याचा वारसा आम्ही पुढे नेऊ असे आश्वासन दिले. यावेळी जीएमसी चे अधीक्षक डॉक्टर इम्रान पठाण, मलिक फाउंडेशनचे नदीम मलिक, एकता संघटनेचे फारुक शेख, राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर रिजवान खाटीक,आसिफ शाह बापू,रहीम तडवी,युसूफ हाजी साहब, युसूफ शेख,इम्रान शेख, साहिद शेख अकील शेख,जावेद शेख, शेरा मुलतानी,नाझिम कुरैसे,फहाद मलिक,अनिश केकेआर,मनन मलिक,अनस मलिक,अर्शद मलिक,सोहेब शेख,फैजान सय्यद,अजाज मन्सुरी,हसिम शेख,मोईन सय्यद,अल्तमश व
वसीम अली यांची होती उपस्थिती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम