स्वतःला सदैव सक्रिय, उत्साही ठेवा: एसडी-सीड कार्यशाळेत मान्यवरांचे प्रतिपादन

एसडी-सीड मार्फत स्मरणशक्ती विकासासाठी कार्यशाळा संपन्न

बातमी शेअर करा...

एसडी-सीड मार्फत स्मरणशक्ती विकासासाठी कार्यशाळा संपन्न

स्वतःला सदैव सक्रियउत्साही ठेवा: एसडी-सीड कार्यशाळेत मान्यवरांचे प्रतिपादन

जळगाव: जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना एसडी-सीड तर्फे मागील सतरा  वर्षांपासून शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. त्याच बरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास साधला जावून भविष्यात त्यांनी स्वावलंबी होणे हा व्यापक दृष्टीकोन समोर ठेवून एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन व .कार्याध्यक्षा मिनाक्षीताई जैन यांच्या पुढाकाराने सॉफ्ट स्किल विकासासाठी मार्गदर्शनपर शिबिरांचे आयोजन नियमित केले जाते

विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन प्रेमाबाई जैन माध्यमिक विद्यालय, जळगाव  येथे करण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुरेश पांडे यांनी उद्बोधन केले.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध गुणकौशल्य असणे आवश्यक आहे. अभ्यास कसा लक्षात ठेवावा? दोन तासांचा अभ्यास ३०-४० मिनिटांत कसा लक्षात ठेवावा? पाठांतराच्या पलीकडे असलेल्या आकृत्या कशा लक्षात ठेवाव्यात? इतिहासातील सनावळ्या कशा लक्षात ठेवाव्यात? लोकांची नावे कशी लक्षात ठेवावीत? मेमरी सायकल म्हणजे काय? अशा सर्व बाबींवर या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.

स्मरणशक्ती वाढविण्यासाठी काही महत्वाची सूत्रे त्यांनी खालील प्रमाणे सांगितली

Ø  स्वतःला सदैव सक्रिय, उत्साही व सकारात्मक ठेवा.

Ø  चुकीच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करा.

Ø  लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा.

Ø  वेळेचं उत्तम नियोजन करा.

Ø  नवनवीन गोष्टी शिकून त्या आत्मसात करा.

Ø  दैनंदिन कामांमधून शरीर व  मेंदूला ब्रेक द्या त्यामुळे फ्रेश वाटेल.

Ø  तुम्हाला सतत पडत असलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा.

Ø  तुमचे चांगले वाईट अनुभव इतरांना शेअर करा.

Ø  आपल्या कामाचा हेतू निश्चित करा.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री. गजानन सूर्यवंशी, एसडी-सीड असोसिएट प्रवीण सोनवणे, सौ. रुपाली वानखेडेसौ. अर्चना धांडे, सौ. धनश्री फिरके, सौ. मीना नारखेडेसौ. मोहिनी चौधरी तसेच सर्व विद्यार्थी  उपस्थित होते.

 

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक व विद्यालयाचे व्यवस्थापन यांच्या बद्दल एसडी सीड गव्हर्निंग बोर्ड चेअरमन डॉ प्रसन्नकुमार रेदासनी यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम