स्वधर्म पालन म्हणजेच खरी देशसेवा – प्रा. प्रकाश पाठक

बातमी शेअर करा...

स्वधर्म पालन म्हणजेच खरी देशसेवा – प्रा. प्रकाश पाठक
रोटरी जळगाव व्याख्यानमालेत विचारमंथन

जळगाव – “प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य म्हणजे स्वधर्माचे पालन करणे आणि तीच खरी देशसेवा आहे,” असे ज्येष्ठ विचारवंत व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. प्रकाश पाठक यांनी प्रतिपादन केले.
गणपती नगर येथील रोटरी हॉलमध्ये रोटरी क्लब जळगाव आयोजित ‘देशसेवेचा अन्वयार्थ’ या विषयावरील व्याख्यानमालेतील प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष गिरीश कुलकर्णी आणि संवाद सचिव पंकज व्यवहारे उपस्थित होते.

प्रा. पाठक म्हणाले, “देश ही केवळ भौगोलिक संकल्पना नसून प्रत्येक देशाला सत्ता, स्पर्धा आणि चिरंतनत्वाचा उद्देश असतो. आपल्या राष्ट्राचा पाया आध्यात्मिक असून श्रद्धेचे भाव आपल्या जीवनात अंगभूत आहेत. देशाचे रक्षण केवळ सैनिकांनीच करायचे हा गैरसमज दूर व्हायला हवा. सर्वसामान्य नागरिकांचे वागणेही त्या देशाचे प्रतिनिधित्व करते.”

ते पुढे म्हणाले, “वागण्यातला प्रभाव बोलण्यापेक्षा अधिक जाणवतो. मूल्य समजून घेत जगली पाहिजेत. आत्मपरीक्षण करून आपण सहजतेने वागत आहोत का, हे पाहणे आवश्यक आहे.”
व्याख्यानादरम्यान त्यांनी स्वामी विवेकानंद, सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, आईन्स्टाईन, चर्चिल, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, लता मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, वसंतराव कानेटकर आणि माधवी लता यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांच्या प्रेरणादायी घटना सांगितल्या.

समारोपात त्यांनी, “आपले काम नीट करणे, स्वतःची भूमिका प्रामाणिकपणे पार पाडणे आणि इतरांना प्रोत्साहन देणे हेसुद्धा देशसेवाच आहे,” असे प्रतिपादन केले.
प्रारंभी परिचय अ‍ॅड. श्रीकांत भुसारी यांनी केला तर आभार व्याख्यानमाला समिती प्रमुख नित्यानंद पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम