स्वातंत्र्यदिनी महावितरणतर्फे सौर योजनांचा जागर

बातमी शेअर करा...

स्वातंत्र्यदिनी महावितरणतर्फे सौर योजनांचा जागर

जळगाव : स्वातंत्र्यदिनानिमित्त महावितरणतर्फे जळगाव शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी केंद्र व राज्‍य शासनाच्या सौर ऊर्जा योजनांचा जागर करण्यात आला.

जळगाव शहरात महानगरपालिका ते काव्यरत्नावली चौक  अशी दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीत मुख्य अभियंता इब्राहिम मुलाणी, कार्यकारी अभियंता दत्तात्र्य साळी यांच्यासह महावितरणचे अभियंते, कर्मचारी व सौर ऊर्जा कंत्राटदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्य अभियंता मुलाणी यांनी रॅलीच्या समारोपानंतर उपस्थितांना संबोधित केले. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सोलर कृषिपंप योजनेची माहिती आणि टीओडी मीटरसंदर्भात वीजग्राहकांना माहिती देण्यात आली. पीएम-सूर्यघर योजनेत ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंत अनुदान केंद्र सरकारतर्फे देण्यात येत आहे. तसेच सौर ऊर्जा निर्मिती संच बसवल्यानंतर ग्राहकांचे वीजबिल जवळपास शून्य होते. टीओडी मीटरमुळे घरगुती ग्राहकांना दिवसाच्या वीजवापरास सवलत मिळत आहे. तसेच ग्राहकांना रिअल टाइम वीजवापर कळणार आहे. तसेच अचूक वीजबिलामुळे ग्राहकांच्या तक्रारीही घटणार आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सर्व योजनांचा लाभ घेण्यासह टीओडी मीटर बसवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महावितरणच्या वतीने करण्यात आले

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम