स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा

बातमी शेअर करा...

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर कडक सुरक्षा

 

 

अनुचित प्रकार टाळण्यासाठी आरपीएफकडून प्रवाशांची कसून तपासणी

 

भुसावळ: भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) गुरुवारी दुपारपासून कडक बंदोबस्त लावला आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी आरपीएफचे जवान अत्यंत सतर्क झाले आहेत.

आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची आणि गाड्यांची कसून तपासणी केली जात आहे. यासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. आरपीएफचे अधिकारी व कर्मचारी प्रत्येक प्रवाशाचे सामान आणि रेल्वेच्या डब्यांमधील प्रवाशांची सखोल तपासणी करत आहेत.

याशिवाय, आरक्षण कक्ष आणि मुसाफिरखाना यांसारख्या गर्दीच्या ठिकाणीही आरपीएफ पथकाद्वारे तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले जात असून, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तूंवर विशेष नजर ठेवली जात आहे. स्वातंत्र्य दिनासारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय सणांच्या दिवशी रेल्वे स्थानके अतिसंवेदनशील मानली जातात. त्यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी आरपीएफने हा विशेष सुरक्षा अभियान राबवला आहे, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम